वाराणसी - पोलीस कॉस्टेबल दिलीप भारती याला २० हजारांची लाच घेताना गोरखपूर पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. आझमगड पोलीस अधीक्षक परिसरातील पब्लिक पार्क येथे ही कारवाई करण्यात आली. बलात्कार पीडितेची नुकसान भरपाईची फाईल पुढे पाठवण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भारतीने २० हजारांची लाच मागितली आणि स्वीकारताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
एसीबीच्या गोरखपूर युनिटचे पथकाचे पोलीस निरीक्षक रामधारी मिश्रा यांनी शनिवारी टीओआयला सांगितले की, बलात्कार पीडित व्यक्तीची तक्रार आल्यानंतर तयार केलेल्या योजनेनुसार एसपी आजमगड कार्यालयात तैनात असलेल्या भारती यांना २०,००० रुपयांची लाच मागण्यासाठी बोलावले होते. एसपी कार्यालयाजवळील एका पब्लिक पार्कजवळ भारती पोहोचले आणि लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाच्या पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. "भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला कोतवाल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, समाजकल्याण विभागाने बलात्कार पीडित व्यक्तीसाठी नुकसान भरपाई मंजूर केली होती, परंतु ही फाइल एसपी आझमगड कार्यालयात प्रलंबित होती. भारती ज्या डेस्कवरून फाइल क्लियर करायची होती. ती फाईल पुढे पाठ्वण्या साठी 20000 रुपयांची लाच मागितली होती. पीडितेने त्यास्तही एका स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली होती.