शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

अरे देवा! एसीबी टीम दारावर होती अन् तहसीलदार गॅस शेगडीवर १५ लाखांच्या नोटा जाळत होता!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:28 AM

इथे सरकारी जमिनीचं टेंडर पास करण्यासाठी तहसीलदारने ठेकेदाराकडून ५ लाख रूपये लाच मागितली होती. डील ठरल्यावर राजस्व निरिक्षक एक लाख रूपयांची रक्कम घेण्यासाठी गेला होता.

राजस्थानमध्ये अ‍ॅंटी करप्शन ब्यूरोने भ्रष्टाचाऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. तेच भ्रष्टाचारी लोक वाचण्यासाठी नवनवीन आयडिया काढत आहेत. याचंच एक उदाहरण बुधवारी बघायला मिळालं. सिरोह जिल्ह्यातील पिंडवाडा तहसीलमध्ये एसीबीने मोठी कारवाई केली. इथे सरकारी जमिनीचं टेंडर पास करण्यासाठी तहसीलदारने ठेकेदाराकडून ५ लाख रूपये लाच मागितली होती. डील ठरल्यावर राजस्व निरिक्षक एक लाख रूपयांची रक्कम घेण्यासाठी गेला होता. ज्याला पाली एसीबीने रंगेहाथ पकडलं.

एसीबी टीम आवाज देत राहिली, तो नोटा जाळत राहिला

मीडिया रिपोर्टनुसार, या घटनाक्रमात आर आयला सायंकाळी ३ ते ४ वाजता एसीबी टीमने पकडलं. यानंतर त्याला सोबत घेऊन पिंडवाडा तहसीलदार कार्यलयात पोहोचले. पण यादरम्यान तहसीलदाराला कुणाच्या तरी माध्यमातून एसीबीच्या कारवाईची खबर लागली होती. अशात तो त्याच्या सरकारी घरात घुसला. यावर एसीबी आणि स्थानिक पोलिसांनी १ तास मेहनत घेतली. तहसीलदाराला आवाज दिले, पण तो काही बाहेर आला नाही. मग एसीबी टीमला दरवाजा तोडावा लागला. जेव्हा दरवाजा तोडून टीम आत गेली तर सर्वजण हैराण झाले.

जळालेल्या नोटा ताब्यात

एसीबी टीम आत येताच तहसीलदार कल्पेश जैन गॅस शेगडीवर नोटा जाळताना आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत तहसीलदाराने तब्बल १५ लाख रूपये इतकी रक्कम गॅस शेगडीवर जाळून राख केली. यानंतर एसीबी टीमने घरात घुसल्यावर आग विझवली. सोबतच जळालेल्या नोटा ताब्यात घेतल्या. आरआय आणि तहसीलदाराला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी