शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

विचित्र अपघात! लिफ्टचं बटण दाबल्यानंतर दरवाजा उघडला, पण लिफ्ट आलीच नाही; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 4:06 PM

मोती रेसिडेन्सी सोसायटीच्या बेसमेंटमध्ये पडून केदारनाथ गौर (७६) यांचा मृत्यू झाला. सोसायटीच्या इमारत बनवणाऱ्या बिल्डरविरोधात भा. दं. वि. कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमोती रेसिडेन्सीमध्ये राहणारे केदारनाथ गौर (७४ वर्ष) नावाचे वयोवृद्ध इमारतीच्या बेसमेंटमध्ये बेशुद्धावस्थेत आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळले.लिफ्ट अडकल्याने अनेकवेळा रहिवाशी त्या लिफ्टमध्ये अडकून पडल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, मेन्टेनन्स विभागाने याकडे लक्ष दिले नाही.

गाझियाबाद - लिफ्टमध्ये बिघाड झाल्यामुळे उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक विचित्र अपघात घडलाय. लिफ्टचं बटण दाबल्यानंतर दरवाजा उघडला परंतु, लिफ्टच आली नाही. हे लक्षात न आल्यानं ७६ वर्षीय वृद्धाचा चौथ्या मजल्यावरून लिफ्टच्या शाफ्टमधून बेसमेंट पडल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गाझियाबाद येथील मुरादनगर परिसरातील एका सोसायटीत हा विचित्र अपघात घडला. मोती रेसिडेन्सी सोसायटीच्या बेसमेंटमध्ये पडून केदारनाथ गौर (७६) यांचा मृत्यू झाला. सोसायटीच्या इमारत बनवणाऱ्या बिल्डरविरोधात भा. दं. वि.  कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोती रेसिडेन्सीमध्ये राहणारे केदारनाथ गौर (७४ वर्ष) नावाचे वयोवृद्ध इमारतीच्या बेसमेंटमध्ये बेशुद्धावस्थेत आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळले. सोसायटीत राहणारे एकजण आपली कार पार्क करून आले तेव्हा त्यांनी लिफ्टचं बटण दाबलं. त्यानंतर लिफ्टचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की समोर लिफ्ट आलीच नव्हती. परंतु, याच दरम्यान लिफ्टच्या शाफ्टमध्ये त्यांनी मोबाईल टॉर्चच्या मदतीने वाकून पाहिलं तर केदारनाथ गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसले.त्यानंतर सोसायटीतील सदस्यांनी गंभीर जखमी झालेल्या केदारनाथ यांना शाफ्ट कापून बाहेर काढलं. रक्तबंबाळ अवस्थेत केदारनाथ यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वीज विभागाचे निवृत्त इंजिनिअर असलेल्या केदारनाथ गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घराबाहेर पडले होते. लिफ्टचं बटण दाबल्यानंतर दरवाजा उघडला, मात्र लिफ्ट आली नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं नसावं आणि त्यांनी लिफ्टच्या शाफ्टमध्ये पाऊल ठेवलं आणि ते खाली बेसमेंटमध्ये कोसळले असावेत, असा अंदाज सोसायटीतील सदस्यांनी व्यक्त केला आहे.या सोसायटीच्या इमारतीतील लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार अनेकवेळा रहिवाश्यांकडून करण्यात आली होती. मेन्टेनन्स विभागालाही याची सूचना देण्यात आली होती. या सोसायटीत जवळपास ५०० कुटुंब राहतात. लिफ्ट अडकल्याने अनेकवेळा रहिवाशी त्या लिफ्टमध्ये अडकून पडल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, मेन्टेनन्स विभागाने याकडे लक्ष दिले नाही. या निष्काळजीपणामुळे ही लिफ्ट दुरुस्त झालेली नव्हती. मुरादनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. कुटुंबानं केलेल्या तक्रारीनुसार बिल्डर विश्वनाथ अग्रवाल आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध (असीम आणि पलाश) भा. दं.वि. कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

 

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

 

सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...

 

Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु 

 

स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या पोलीस पदके केंद्राकडून जाहीर

 

एक अधिकाऱ्यासह 13 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस