पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ रस्त्यावर कस्तुरबा चौकाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला ओलांडून ही कार औंधकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला जाऊन धडकली. या अपघातात दोघांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी झाले. प्रतीक प्रमोद राम शेट्टीवार (वय 29 ) व राहुल रामचंद्र नायर (वय 28 रा. हरी ओम सोसायटी, औंध ) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नावे आहेत. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. मोटारीतील सर्वे दिल्ली येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने विद्यापीठ रस्त्यावर भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू ,४ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 11:28 IST
अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने विद्यापीठ रस्त्यावर भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू ,४ जखमी
ठळक मुद्देगुरुवारी रात्री घडली घटना; अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर मोटारीतील सर्वे दिल्ली येथील असल्याची प्राथमिक माहिती