कॅनडाच्या टोरंटोमध्ये भीषण अपघात झाला आहे. रस्ते अपघातात ५ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. व्हॅन आणि ट्रॅक्टर ट्रेलर एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक मीडियाने म्हटले आहे.
कॅनडातील उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी सांगितले की, ही घटना १३ मार्च रोजी घडली. टोरंटोजवळ झालेल्या या अपघातात ५ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाची टीम मदतीसाठी मृत विद्यार्थ्यांच्या मित्रांच्या संपर्कात आहे.
हरप्रीत सिंग, जसपिंदर सिंग, करणपाल सिंग, मोहित चौहान आणि पवन कुमार यांचा अपघातात मृत्यू झाला. या सर्वांचे वय 21 ते 24 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृत विद्यार्थी ग्रेटर टोरंटो आणि मॉन्ट्रियल भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी पहाटे ३.४५ वाजता महामार्ग-४०१ वर हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर 2 विद्यार्थ्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.