शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

सरपंच पदाच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी ‘त्याने’ रचला अपघाताचा कट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 9:39 PM

नऱ्हे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याच्या रागातून महिला सरपंचच्या पतीला धडक देऊन अपघाताचा बनाव करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़.

ठळक मुद्देपोलिसांनी केली दोघांना अटक : नऱ्हे ग्रामपंचायत सरपंच पद निवडणूक

पुणे : नऱ्हे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याच्या रागातून महिला सरपंचच्या पतीला धडक देऊन अपघाताचा कट करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़. अविनाश कैलास कांबळे (वय ३९, रा़. विठ्ठल कलावती निवास, नऱ्हे ) आणि नितीश सतीश थोपटे (वय ३०, रा़. थोपटे बिल्डिंग, धायरी) अशी त्यांची नावे आहेत़. ही घटना मुंबई -बंगलुरु महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडला ओमकार लॉजजवळ १३ मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली होती़. अपघातात बाळासाहेब सोपान वनशिव (वय ५२, रा़.नऱ्हे ) हे गंभीर जखमी झाले आहेत़. त्यांच्या डोक्याला मार लागला असून हातपायाला गंभीर जखमा झाल्या आहेत़. त्यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत़.पोलिसांनी सांगितले की, बाळासाहेब वनशिव हे नऱ्हे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाक्षी वनशिव यांचे पती आहेत़ ते व त्यांचे मित्र प्रकाश टिळेकर हे १३ मार्चला सकाळी साडेपाच वाजता नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते़ आंबेगाव खुर्द येथील सर्व्हिस रोडने ते जात असताना एक पांढऱ्या रंगाची कार दोन ते तीन वेळा त्यांच्या बाजूने फिरुन गेली होती़. व्यायाम करुन ते परत येत असताना सर्व्हिस रोडच्या कडेने ते जात होते़. तेव्हा मागून आलेल्या कारने वनशिव यांना जोरात धडक दिली व ती कार वेगाने निघून गेली़ टिळेकर व वनशिव यांच्या नातेवाईकांनी त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले़. सरपंच मिनाक्षी वनशिव यांनी अविनाश कांबळे यांच्यावर संशय व्यक्त केला होता़. या गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक फौजदार प्रदीप गुरव व पोलीस शिपाई जगदीश खेडेकर यांना कांबळे व थोपटे हे दोघे कोळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ थांबले असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला़. त्यांचा मित्र रोहीत पवार (रा़. नऱ्हे ) याची कार घेऊन गुन्हा केल्याचे सांगितले़. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, सहायक उपनिरीक्षक प्रदीप गुरव, हवालदार विनोद भंडलकर, गणेश सुतार, उज्वल मोकाशी, प्रणव सकपाळ, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडकर यांनी केली़. ............बाळासाहेब वनशिव यांच्या पत्नी मिनाक्षी यांनी अविनाश कांबळे यांच्या पत्नी रेश्मा कांबळे यांचा सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभव केला होता़. त्याचा राग मनात धरुन त्यांनी वनशिव यांच्या अंगावर गाडी घालून अपघाताचा बनाव करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला़. भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस