रांची - झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पोलिसांचा कर्तव्यात कसूर करणारा चेहरा समोर आला आहे. गिरिडीह जिल्ह्यातील गडकुरा गावाजवळ वऱ्हाड्यांनी भरलेली गाडी अनियंत्रित होऊन उलटली. गाडी उलटल्याने सुमारे पाच-सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आले. या घटनेबाबत सांगण्यात आले की, पडरिया गावातून पपिलो गावामध्ये वऱ्हाड जात होते. तेवढ्यात हा अपघात झाला. रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलिसांना याची खबर देण्यात आली. मात्र पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे.
अपघाताची माहिती देण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला असता. पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले की, साहेब आता झोपले आहेत. त्यांच्या उठण्याची वेळ सकाळी आठ वाजताची आहे. दरम्यान, अपघातानंतर जखमी प्रवासी वाहनाखाली अडकून तडफडत होते. मात्र पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचले नाहीत. त्यानंतर ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात पाठवले. तर उलटलेल्या गाडीला उचलण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली.
अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे ही घटना घडली आहे. मात्र जेव्हा अपघाताचाची माहिती तिसरी पोलीस ठाण्यातील पोलिसांना देण्यात आली तेव्हा पोलीस प्रशासन तिथे पोहोचले नाही. त्यामुळे स्थानिकांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला.
ग्रामस्थांनी सांगितले की, आम्हीच जेसीबी आणले आणि गाडीला उचलून दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये पाठवले. तर जखमींना उपचार करण्यासाठी खोरी यमहुआ येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच ज्यांची प्रकृती गंभीर होती त्यांनी धरबाद येथे पाठवण्यात आले.