ठाणे - खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर सुटल्यानंतर गेल्या सात वर्षापासून पसार असलेल्या रफीक शेख (45, रा. मुंब्रा) या फरार आरोपीला पुन्हा जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट 5 ने गुरुवारी अटक केली. त्याला रत्नागिरी पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.पॅरोल रजेवर सुटून आल्यानंतर खूनाच्या गुन्हयातील शेख हा मुंब्रा परिसरात वास्तव्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे युनिट पाचच्या पथकाने मुंब्रा येथून त्याला 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा. च्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात 17 फेब्रुवारी 2007 रोजी खुनाचा झाला होता. याच गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. 23 जानेवारी 2012 रोजी पॅरोलवर तो बाहेर आला होता. त्यांनतर 14 दिवस संचित रजा भोगून पुन्हा कारागृहात हजर होणो आवश्यक असतांनाही तो हजर झालाच नाही. गेल्या सात वर्षापासून फरार असलेल्या या कैद्याचा रत्नागिरी पोलिसांकडूनही शोध सुरुच होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात 12 जानेवारी 2014 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध जबरी चोरी, दरोडा आणि घरफोडी असे 22 गुन्हयांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवरे यांनी सांगितले.
७ वर्षांपासून फरार आरोपी पुन्हा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 9:56 PM
23 जानेवारी 2012 रोजी पॅरोलवर तो बाहेर आला होता.
ठळक मुद्देयाच माहितीच्या आधारे युनिट पाचच्या पथकाने मुंब्रा येथून त्याला 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा.च्या सुमारास ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात 12 जानेवारी 2014 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.