अजय युवा पणजी - उत्तर गोव्यातील कोलवाळ या कारागृहमधून आज सकाळी एक कैदी पळून गेल्याचे खात्रीपूर्वक वृत् असून या कैद्यावर ड्रग्स प्रकरणी आरोप आहे. हेमराज भारद्वाज असे या तरुण कैद्याचे नाव आहे. तो मूळचा हिमाचल प्रदेशमधील असून वय 27 वर्षे आहे.
त्याच्या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. तो खटला ययालयात सुरू असून गेली दहा वर्ष हेमराज यामध्ये ट्रायल कैदी आहे. दहा वर्ष झालेल्या काही कैद्यांना कारागृहातील काही कामे लावला जातात. स्वच्छतेची कामे बाग-बगीचे मधील कामे यासाठी या कैद्यांचा वापर केला जातो. आज संकाळी हेमराजला देखील त्याची काही कामे दिलेली होती. ती कामे त्याला लेखी आदेशाने दिलेली होती की तोंडी आदेशाने याची खातरजमा अजून झालेली नाही. स्वच्छतेची कामे करण्यासाठी काही काळ बाहेर आणलेल्या त्या कैद्याने तेथून पलायन केले. कोलवाळ कारागृह वादग्रस्त कारागृह म्हणून संपूर्ण गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे. कारागृह आहे की हिल स्टेशन आहे असा प्रश्न पडावा असे या कारागृहाचे कामकाज चालते. मोबाईल असो अमली पदार्थ, असो खाद्यपदार्थ असो, कैद्याला जे हवे त्या सोई या कारागृहात कैद्यांना मिळतात. या कारागृहामधून कैदी पळून जाण्याचे प्रकारही सातत्याने होत असतात कारागृह बदनाम झालेले असून बदनामी वर आज आणखी एकदा शिक्कामोर्तब झाले त्यामुळे कारागृहाच्या प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?
सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!