नाशिक : पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक आरोपीने न्यायालयात चक्का बोगस जामीनदार उभा करून न्यायालयाची दिशाभूल व फसवणूक करीत जामीन मिळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर राजेंद्र हिरावत (२५, रा. हिरावत चाळ, सुदर्शन कॉलनी दत्तनगर, पेठरोड पंचवटी) याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणात १५ डिसेंबर २०१२ पासून ते २९ सप्टेंबर २०२२ कालावधीत जामीनदार म्हणून सहायक अधीक्षक दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुरू आहे. या खटल्यात आरोपी मयूर राजेंद्र हिरावत याने जामीन मिळविण्यासाठी गणपत भिका जाधव (रा. गंगापूर गाव, नाशिक ) हे २ डिसेंबर २०१४ रोजी मयत झालेले असतानाही त्यांच्या जमिनीचा सातबारा व आधारकार्डचा १५ डिसेंबर २०२० रोजी न्यायालयात ४० ते ४५ वयाव्या व्यक्तीला जामीनदार म्हणून सहायक अधीक्षक दिवाणी व फौजदारी न्यायालयात उभा करून स्वत:चा जामीन करून घेत न्यायालयाची दिशाभूल करून फसवणूक केली. या प्रकरणात मयूर राजेंद्र हिरावत व गणपत भिका जाधव यांच्याऐवजी न्यायालयात उभा राहिलेल्या अनोळखी व्यक्तीविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिशाभूल व फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.