मंगरुळपीर : तालुक्यातील घोटा येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी पुण्यावरून २४ तासात अटक केली आहे.
तालुक्यातील घोटा येथील एका महिलेने ११ जुले रोजी पोलिसांत तक्रार दिली की, १० जुले रोजी फिर्यादी महिला शेताचे काम करून घरी परत आली असता फिर्यादीची १५ वर्षीय मुलगी घरी दिसली नाही. तीचा आजुबाजुला व नातेवाईकांकडे शोध घेतला असता तिचा शोध लागला नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने मुलीस पळवून नेले, अशी तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे फिरविली असता, रोशन पांढरे (१९) रा. घोटा याने मुलीस पळवून नेल्याचे समोर आले. सायबर सेलच्या आधारे मुलगी व आरोपी हे पुणे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे महादेव सोळंके व अरविंद सोनोने यांनी आरोपी व मुलीस १२ जुलेरोजी पुणे येथून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास एपीआय तुषार जाधव यांचेकडे देण्यात आला.
पॉस्को कलम वाढविलेया प्रकरणातील आरोपीला २४ तासात अटक करण्यात आली. तसेच आरोपी विरुद्ध कलम ३६६, ५०६ व पॉस्को कलम वाढविण्यात आले.