लातूर : शहरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या दप्तरी नाेंद असलेला घरफाेडी आणि चाेरी प्रकरणातील फरार आराेपी तब्बल बारा वर्षानंतर शुक्रवारी दुपारी पाेलीस पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुरनं. ५६६/ २००९ नुसार दत्ता वसंत गिरी (३८ रा. महाराणा प्रताप नगर, म्हाडा काॅलनी लातूर) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. गुन्हा घडल्यापासून आराेपी पाेलिसांना सतत गुंगारा देत फरार हाेता. पाेलीस त्याच्या मागावर हाेते. दरम्यान, पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांच्या अटकेसाठी विशेष माेहीम सुरु केली आहे. पाेलीस पथकाला खबऱ्याने माहिती दिली. लातुरातील स्क्रॅप मार्केट परिसरात आराेपी येणार असल्याने, पाेलिसांनी सापळा लावला.
दरम्यान, आराेपी दत्ता गिरी हा स्क्रॅप मार्केट परिसरात शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आला. त्यास पाेलिसांनी शिताफिने अटक केली. ही कारवाई लातूर शहर उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पाेलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस हवालदार दामाेदर मुळे, पाेलीस नाईक दत्तात्रय शिंदे, पाेलीस नाईक रणजित शिंदे यांच्या पथकाने केली.