लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खंडणी वसूल करण्यासाठी हे एका किराणा दुकान चालविणाºया तरुणाचे अपहरण करून त्याला पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न करणाºया आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.रविवारी सकाळी ८ च्या सुमारास भावेश थावरदास भागवानी (वय २०) नामक व्यापारी खेळायला जात असताना आरोपी सागर शिवलाल यादव (वय २५) आणि रजत अनिल राऊत (वय २३) या दोघांनी त्याला इतवारी रेल्वे स्थानकाजवळ रोखले. आरोपी यादव आणि राऊत या दोघांनी भावेशला जबरदस्तीने आपल्या गाडीवर बसविले. त्याला युनिव्हर्सल पेट्रोल पंपावर नेले. तिथे त्याला त्याच्या मोहित नामक मित्राला फोन करायला लावला आणि पैशाची मागणी केली. त्यानंतर भावेशला मारहाण करून आरोपींनी त्याच्यावर पेट्रोल ओतले. यावेळी आरोपीकडे लायटरही होते. धोका लक्षात घेऊन वेळीच पंपावरील कर्मचारी धावल्याने आरोपी मागे झाले. या घटनेमुळे घाबरलेला भावेश घरी निघून गेला. त्यांनी ही माहिती घरच्यांना आणि मित्रांना सांगितली. त्यानंतर त्यांनी धीर दिल्यामुळे सायंकाळी ५.३० च्या सुमारास तो शांतिनगर पोलिसांकडे आला. त्याने तक्रार नोंदविली. पोलिसांनी रात्री उशिरा या प्रकरणात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी पीसीआर मिळावा, अशी मागणी केली. मात्र समोर आलेला घटनाक्रम आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी यादव तसेच राऊतला न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.जुगार की सावकारी?जुगार किंवा सावकारीच्या पैशातून ही घटना घडल्याचे बोलले जाते. आरोपी सागर यादव याने मोहितला काही दिवसांपूर्वी रक्कम दिली होती. त्याबदल्यात त्याची बाईक स्वत:कडे ठेवली होती. ती खराब झाल्यामुळे मोहितने सागरचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यामुळे मोहितचा मित्र भावेश याला वेठीस धरून आरोपीने मोहितकडून रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केला. आरोपी सागर हा कुख्यात गुन्हेगार असून, राऊतही बुक्कीशी संबंधित असल्याचे समजते.
नागपुरातील शांतिनगर प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:51 PM
खंडणी वसूल करण्यासाठी हे एका किराणा दुकान चालविणाºया तरुणाचे अपहरण करून त्याला पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न करणाºया आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
ठळक मुद्देअपहरण करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न : किराणा व्यापाऱ्यांची तक्रार