नवी मुंबई - मुलीचा शोध घेत पुण्यावरून आलेल्या टोळीने मुलीच्या भावाला जबर मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री कोपर खैरणेत घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हॉकी स्टिक, चाकू, सूरा अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.कोपर खैरणे सेक्टर 8 येथील उद्यानात रविवारी रात्री हा प्रकार घडला. त्याठिकाणी कार मधून आलेल्या काही तरुणांनी एका तरुणाला जबर मारहाण करून पळ काढला होता. याची माहिती बिट मार्शल पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस नाईक साईनाथ सोनवणे, शिपाई महेश गावडे, मुकिंदा सोलनकर व सचिन दळवी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांना आरोपींची कार गेलेल्या दिशेची माहिती मिळताच त्यांनी भर पावसात दुचाकीवरून कारचा पाठलाग केला. अखेर रबाळे एमआयडीसी येथील दुर्गामाता नगर परिसरात आरापींची कार अडवण्यात पोलिसांना यश आले. त्याठिकाणावरून पाच जणांना अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांनी सांगितले. अटक केलेले सर्वजण मूळचे पुणेचे राहणारे आहेत. अविनाश शंकर खटापे, भरत लहू पाटील, संदीप निवृत्ती दरडीगे, अनिल दत्ता पिलाने व सुमित बाबूजी शिंदे अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या कारमधून हॉकी स्किट, चाकू व सुरा अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
हे सर्वजण एका मुलीचा शोध घेत पुणेवरून कोपर खैरणेत आले होते. सेक्टर 8 परिसरात ते हेरगिरी करत असताना त्यांचा सामना मुलीच्या भावाशी झाला. यावेळी त्यांनी मुलीच्या भावावर जीवघेणा हल्ला करून पळ काढला होता. परंतु पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बिट मार्शल पोलिसांनी थरारक पाठलाग करून आरोपींना अटक केली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर
बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी