वाकड : जुन्या भांडणाची खुन्नस काढत हातात तलवारी, कोयते आणि काठया घेऊन सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने दिसेल त्याला मारहाण व वाहनांची तोडफोड केली. तसेच काहींच्या घरात घुसत संसारोपयोगी वस्तूंची नासधूस करण्यात आली. हा प्रकार वाकड काळखडक झोपडपट्टीत रविवारी (दि २५) रात्री नऊच्या सुमारास घडला. या प्रकाराने झोपडपट्टीवासीय प्रचंड दहशतीखाली आहेत. याबाबत रात्री उशिरा वाकड ठाण्यात सात जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जखमी शांताबाई जाधव (वय ५०, रा काळाखडक झोपडपट्टी, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे तर रस्त्याने जाणा?्यावर करण्यात आलेल्या अंदाधुंद काठी हल्ल्यात शांताबाई यांच्यासह त्यांची नात पूर्वा गुंजाळ (वय ३) या बालिकेसह दिलीप खुळे पेटे (वय ६०) व कळमकर (पूर्ण नाव समजू शकले नाही) रा सर्वजण काळाखडक हे जखमी झाले आहेत. तर सहा दुचाकींची देखील तोडफोड करण्यात आली. तोडफोड आणि मारहाणीवरच ते थांबले नाहीत तर त्या गुंडांनी अमानुषपणाचा कळस करत काहींच्या घरात घुसून संसारपयोगी समान रस्त्यावर फेकले वस्तूंची तोडफोड करीत दहशत माजविली. या प्रकाराने सर्वत्र हाहाकार सुरू झाला. घटनेनंतर दाखल झालेल्या वाकड पोलिसांनी पंचनामा करून आरोपींची नावे देखील मिळविली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शांताबाई यांचा मुलगा किरण जाधव याच्या दुचाकीचे सीट कव्हर कोणीतरी फाडले त्याचा संशय शेजाºयांवर घेतल्यामुळे दोन्ही कुटुंबात भांडणे झाली आणि ती आपापसात मिटली. पण नंतर सर्व काही शांत झाले असताना दोन दिवसांनी रविवारी पुन्हा या भांडणाचे रूपांतर मोठ्या टोळीकडून मारहाण तोडफोडीत झाले.अचानक घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र पळापळ सुरू झाली. त्यापैकी आरोपींची चार नावे निष्पन्न आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पूर्ववैमनस्यातून वाकड येथील काळाखडक झोपडपट्टीत गुंडांचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 1:51 PM
जुन्या भांडणाची खुन्नस काढत हातात तलवारी, कोयते आणि काठया घेऊन सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने दिसेल त्याला मारहाण व वाहनांची तोडफोड केली.
ठळक मुद्देअल्पवयीन मुलीसह तिघे गंभीर जखमीवाकड ठाण्यात सात जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल