लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मास्कधारी दोन व्यक्तींनी दिल्लीमध्ये बुधवारी १७ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला केला. त्यात चेहरा, डोळ्याला गंभीर जखमा झालेल्या या मुलीवर सफदरजंग रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. या हल्ल्याबाबत दोन संशयितांची नावे पीडित मुलीने पोलिसांना सांगितली असून त्यातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्याचा समाजातील सर्व स्तरांतून तीव्र निषेध करण्यात येत आहे.
ही मुलगी धाकट्या बहिणीसोबत सकाळी शाळेत जात असताना दिल्लीतील उत्तमनगरामध्ये तिच्यावर ॲसिड हल्ला झाला. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
ॲसिड मिळालेच कसे?ॲसिड विक्रीवर बंदी असतानाही हल्लेखोरांना ॲसिड उपलब्ध झालेच कसे, असा सवाल नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.संपूर्ण बंदी कधी : महिला आयोग ॲसिड विक्रीवर संपूर्ण बंदी घालावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही करत आहोत. दिल्लीतील ॲसिड हल्ल्यानंतर तरी सरकारला जाग येईल, अशी अपेक्षा दिल्ली महिला आयोगाने व्यक्त केली आहे.
घरातून निघाल्यानंतर लगेचच हल्लाn त्या मुलीच्या वडिलांनी पत्रकारांना सांगितले की, माझी मुलगी व तिची धाकटी बहीण शाळेत जाण्यासाठी घरातून सकाळी साडेसात वाजता निघाल्या. n त्यांनी घरासमोर रस्ता ओलांडला व मुलीवर ॲसिड हल्ला झाला. घरातून निघाल्यानंतर अवघ्या सहा ते सात मिनिटांत ही घटना घडली. माझ्या धाकट्या मुलीने धावत येऊन हा सारा प्रकार सांगितल्याने आम्ही तडक घटनास्थळी गेलो.