कानपूरमध्ये 2005 मध्ये एका महिलेवर अॅसिड हल्ला केल्याप्रकरणी 43 वर्षीय व्यक्तीने 7 वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर याच महिलेवर बलात्कार केला होता. महिलेवर बलात्कार करून आरोपी फरार झाला असून त्याला दिल्लीपोलिसांनी बंगळुरू येथून अटक केली आहे.
पोलीस उपायुक्त समीर शर्मा म्हणाले, “महिलेने यावर्षी २१ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती की, तिच्या दिराने तिच्या पती आणि मुलांवर गेल्या वर्षी १३ डिसेंबर रोजी अॅसिड हल्ला करण्याची धमकी देत घरातच तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली.
डीसीपी समीर शर्मा म्हणाले, "तपासादरम्यान पोलिसांना कळले की, 2005 मध्ये कानपूरमध्ये त्या व्यक्तीने महिलेवर अॅसिड फेकले होते. या प्रकरणी त्याला सात वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली आणि कानपूरमधील त्याच्या ओळखीच्या लोकांना विचारणा करून महिलेच्या शोधात दिल्ली गाठली आणि तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांनी सांगितले की, 'महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपी पळून गेला. आरोपीच्या धमक्यांना घाबरलेल्या महिलेने तीन महिन्यांनी बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी 21 मार्च रोजी कलम 376 आणि 506 अंतर्गत बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीचा गुन्हा दाखल केला होता आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आणि पकडण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमले होते.टीमने दिल्लीतील त्याच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले आणि कानपूरलाही गेले, परंतु त्याने आपला मोबाईल फोन बंद केल्यामुळे त्याचा शोध लागला नाही. तांत्रिकदृष्ट्या पाळत ठेवून तपासकर्त्यांनी त्याचा बेंगळुरू येथे शोध घेतला. विशेष बाब म्हणजे पोलिसांच्या पथकाने तीन दिवस बेंगळुरूमध्ये तळ ठोकला आणि त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
मदरशात शिकवणाऱ्या मुफ्तीनं ११ वर्षीय मुलावर १९ वेळा केला लैंगिक अत्याचारडीसीपी समीर शर्मा यांनी सांगितले की, आरोपीला दिल्लीत आणले जात आहे, अॅसिड हल्ल्याच्या तपशीलासाठी आम्ही कानपूर पोलिसांशी संपर्क साधू आणि अॅसिड हल्ल्यापूर्वी किंवा नंतरच्या गुन्ह्यांमध्ये तो सहभागी होता का हे शोधण्याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत.