द काश्मीर फाइल्स चित्रपटावरून कानपूरमध्ये एसीपीचा गनर आणि ड्रायव्हर यांच्यात झालेल्या भांडणानंतर ड्रायव्हर स्वतंत्र यादवला निलंबित करण्यात आले आहे. द काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या समर्थनावरून दोघांमध्ये भांडण झाले होते.या भांडणानंतर अतिरिक्त डीसीपी ब्रजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, एसीपीसोबत वाद झाल्यानंतर गनरने चालकावर मारहाणीची तक्रार दाखल केली होती. ड्रायव्हर चित्रपटाला विरोध करत होता. तपासात चालक दोषी आढळल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.या घटनेची उत्तर प्रदेशातील सर्व सरकारी कर्मचारी चित्रपटाच्या समर्थन आणि विरोधाबाबत चर्चा करत आहेत. मात्र, चित्रपटाला विरोध करणाऱ्या निलंबित ड्रायव्हर स्वतंत्र यादव याने आज तकशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिले होते. आम्ही दोघे मिळून एसीपीची ड्युटी करतो, असे चालकाने सांगितले होते. आपापसात वाद झाला, अशा स्थितीत याला फारसे महत्त्व देऊ नये. त्याने आरोप केला आहे की, गनर नरेश सिंग मारण्यासाठी माझ्याकडे धावला होता आणि मी त्याला फक्त धक्का दिला होता. ही घटना समोर आल्यानंतर डीसीपीने दोन्ही हवालदारांना आधीच ताशेरे ओढले होते आणि चौकशीनंतर चालक स्वतंत्र यादवला मारहाणीप्रकरणी दोषी ठरवून निलंबित करण्यात आले होते.
"द काश्मीर फाइल्स"च्याविरोधात भिडणारा ड्रायव्हर निलंबित, गनरला केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 3:16 PM