मुंबई - अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) आदर्श क्रेडिट को - ऑपरेटिव्ह सोसाइटी लिमिटेड (ACCSL) प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार आदर्श क्रेडिट को - ऑपरेटिव्ह सोसाइटी लिमिटेडची एकूण1489 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
ईडीने जप्त केलेल्या संपत्तीमध्ये आदर्श ग्रुपची 1464.76 कोटी रुपयांची जमीन आणि भवन यांचा समावेश आहे. त्याशिवाय, वेगवेगळी बँकांमध्ये २४. ४४ कोटी रुपये जमा होते ते देखील हस्तगत करण्यात आले आहेत. राजस्थान, हरियाणा, नवी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. पीएमएलएअंतर्गत केलेल्या चौकशीत मुकेश मोदीने आपले नातेवाईक वीरेंद्र मोदी, राहुल मोदी आणि अन्य सहकाऱ्यांच्या मिलीभगत करून एसीसीएसएलने इंटर लिंक बोगस व्यवहार करत गुंतवणूकदारांचे पैसे चुकीच्या पद्धतीने वापरले असल्याचे उघड झाले आहे.