राजगुरुनगर : खेड पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात वाळू धुण्यासाठी आलेल्या ६ गाड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करण्यात आली आहे.यात एकूण १ लाख ९२ हजार रुपये किंमतीची २४ ब्रास वाळू शनिवारी (दि. २०) जप्त केली आहे. याप्रकरणी उपविभागीय कार्यालयातील सागर शिंगाडे व अविनाश कालेकर यांनी फिर्याद दिली आहे . याबाबत ठाणे अंमलदार रमेश ढोकले यांनी दिलेल्या माहितीनुसार,सिद्धेश्वर मंदिराच्या पूर्व बाजूस या गाड्या वाळू धुण्यासाठी उभ्या होत्या. यासर्व गाडयांच्या मालकांनी रॉयल्टी भरलेली नव्हती. तसेच महसूल विभागाचा कोणताही परवाना त्यांनी घेतला नव्हता. या कारवाईत मयुरेश येवले व गणेश काळे यांच्या प्रत्येकी दोन तर प्रशांत शिंदे व चेतन पवार यांची प्रत्येकी एक गाडी पकडण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवरे यांनी केली.पुढील तपास तानाजी हगवणे करत आहे. ...................
राजगुरुनगर येथे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई, ६ वाहने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 6:21 PM
खेड पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात वाळू धुण्यासाठी आलेल्या ६ गाड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करण्यात आली आहे .
ठळक मुद्देएकूण १ लाख ९२ हजार रुपये किंमतीची २४ ब्रास वाळू जप्त