पालघर - बोईसर भागात अवैध्यरित्या वास्तव करणाऱ्या १२ बांग्लादेशींना पालघरमधील दहशतवाद विरोधी कक्षाने (एटीसी) अटक केली आहे. अटक केलेल्या ३ पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे. बोईसर भागात बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव करत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाला मिळाली होती. त्याअनुषंगाने दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील त्यांचेकडील स्टाफ व अँटी ह्यूमन ट्रफिकिंगच्या महिला पोलीस अधिकारी श्रीलक्ष्मी बोरकर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने बोईसरच्या यशवंत सृष्टी परिसरातून एकूण १२ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम ३, (अ), ६(अ) सह विदेशी नागरीक अधिनियम कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटीसीने केली कारवाई; १२ बांग्लादेशींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:52 IST
बोईसरच्या यशवंत सृष्टी परिसरातून एकूण १२ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे.
एटीसीने केली कारवाई; १२ बांग्लादेशींना अटक
ठळक मुद्देबोईसर भागात बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव करत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाला मिळाली होती. भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम ३, (अ), ६(अ) सह विदेशी नागरीक अधिनियम कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.