ठाणे : ठाणे, कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर भागात खून, दरोडे आणि खंडणीचे गुन्हे करणाºया रवी पुजारी टोळीसह ३२ जणांविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत ठाणे शहर पोलिसांनी गेल्या वर्षभरामध्ये कारवाई केली आहे. यामध्ये कासीम अफसर इराणी उर्फ सय्यद उर्फ जाफरी या सोनसाखळीची जबरी चोरी करणाºया कुख्यात टोळी प्रमुखाचाही समावेश आहे.
संघटितपणे गुन्हे करणाºया टोळ्यांवर जबर बसून त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये एकट्या रवी पुजारी आणि त्याच्या टोळीवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये २६ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे खंडणीचे असून, एक-दोन खुनाचे, तर एक खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे. पुजारी सर्वच गुन्ह्यांमध्ये वाण्टेड आहे. त्याला बंगळुरू पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्याची कार्यवाही ठाणे पोलिसांनीही सुरू केली आहे.
२०१८ च्या भिवंडी येथील खंडणीच्या एका गुन्ह्यात राजेश करोतियाच्या नऊ जणांच्या टोळीवरही नारपोली पोलिसांनी मकोकाअंतर्गत कारवाई केली. यामध्ये अंजू उर्फ प्रभाकर मनोज सिंग, हिरामण गंगावासी, प्रमोद मुन्नर (रा. गांधीनगर, ठाणे), राजेश करोतिया, राजेश परदेशी आदी नऊ जणांचा समावेश आहे. अन्य गुन्ह्यामध्ये हरविंदर सिंग उर्फ चिक्कू अजयसिंग लबाना च्या टोळीवरही मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केली आहे. यात हरविंदरसह हरदीप उर्फ हनी लबाना, मॉन्टी करोतिया, बिट्टू उर्फ मिट्टू ठाकूर आणि शाहीद शेखसह दहा जणांचा समावेश आहे. या टोळीवर हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसारही कारवाई केली आहे. याशिवाय, मध्यप्रदेशातून येऊन ठाणे, मुंबई परिसरात जबरी चोरीचे गुन्हे, पोलिसांवर हल्ला करणाºया चिन्न गोगुलसह नऊ जणांच्या टोळीवरही कल्याणच्या महात्मा चौक पोलिसांनी २०१९ मध्ये मकोकाची कारवाई केली. या टोळीवर हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हे दाखल आहेत. यामध्ये इलियास राजशेखर आणि अरुण पटेला आदी कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे. या टोळीवर सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.गेल्या वर्षभरात ३२ जणांना अटकनारपोली पोलिसांनीही बैतुल्ला चौधरी या सोनसाखळी जबरी टोळीतील कबीर शेख, स्वप्निल उर्फ गोट्या पांचाळ आदी सात जणांविरुद्ध कारवाई केली आहे. खडकपाडा पोलिसांनी कासीम अफसर इराणी उर्फ सय्यद उर्फ जाफरी या सोनसाखळी जबरी चोरी करणाºया टोळीवरही मकोकाची कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरामध्ये या पाच टोळ्यांमधील २६ तसेच पुजारीच्या सात जणांविरुद्ध अशा ३२ जणांवर मकोकाची कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.