अभिनेता अरमान कोहलीचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. NDPS केसमध्ये अरमान कोहली ऑगस्टपासून जेलमध्येच आहे. मात्र याच प्रकरणातील करीम धनानी आणि इम्रान अन्सारी या अन्य दोन आरोपींचा जामीन अर्ज हायकोर्टाने मंजूर केला आहे. करीम धनानी आणि इम्रान अन्सारी यांची सुटका करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत.
अभिनेता अरमान कोहली याला याच्या मुंबईतील घरात ड्रग्ज जप्त केल्यानंतर एनसीबीने त्याला अटक केली होती. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात धाडसत्र सुरू झालं. आजतागायत बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. अरमान कोहली याला त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली असून तो जेलमध्ये आहे. एनसीबी पथकाने एका ड्रग पेडलरला अटक केली होती.
या ड्रग्ज पेडरलचे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांशी संबंध असल्याचं उघडकीस आलं. गुप्त माहितीच्या आधारावर एनसीबीने बॉलीवूड अभिनेता अरमान कोहली याच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. मुंबई विभागाचे झोनल डायरेक्टर समीर वानखेड़े यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापेमारी करण्यात आली होती.