अभिनेता एजाज खानला दिलासा; हायकोर्टाने केला जामीन मंजूर  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 06:12 PM2018-12-08T18:12:59+5:302018-12-08T18:15:03+5:30

विशेष एनडीपीएस न्यायालयाने एजाजचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर एजाजने मुंबई हायकोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला. त्यानंतर या अर्जावर सुनावणीदरम्यान न्या. प्रकाश नाईक यांनी एजाजला जामीन मंजूर केला आहे

Actor Ejaz Khan consoles; High Court granted bail | अभिनेता एजाज खानला दिलासा; हायकोर्टाने केला जामीन मंजूर  

अभिनेता एजाज खानला दिलासा; हायकोर्टाने केला जामीन मंजूर  

Next
ठळक मुद्दे नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने  अटक केली होतीविशेष एनडीपीएस न्यायालयाने एजाजचा जामीन अर्ज फेटाळून लावला होताएजाजने मुंबई हायकोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला

मुंबई - अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सिने अभिनेता एजाज खान याला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने  अटक केली होती. सीबीडी बेलापूर सेक्टर 20 येथे  ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात  त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांनतर तो जामिनासाठी विशेष एनडीपीएस न्यायालयात गेला. मात्र, विशेष एनडीपीएस न्यायालयाने एजाजचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर एजाजने मुंबई हायकोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला. त्यानंतर या अर्जावर सुनावणीदरम्यान न्या. प्रकाश नाईक यांनी एजाजला जामीन मंजूर केला आहे. 

एजाज खान याने अनेक टिव्ही मालिका व बिग बॉसमध्ये काम केलेलं आहे. सीबीडी बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये एजाज ड्रग्जच्या गोळ्या घेऊन येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या पथकाने हॉटेलच्या रूमवर छापा टाकला. त्यावेळी त्याच्याकडे Ecstasy ड्रगच्या आठ गोळ्या आणि २ मोबाईल सापडले. तो अंधेरीला रहायला असून त्याच्याकडे हे अमली पदार्थ कुठून आले. त्याला हा अमली पदार्थ कोणी पुरविला याचा पोलीस तपास करत होते. २.३० ग्रॅम वजनाचा एमडीएम (Ecstasy) हा अमली पदार्थ पोलिसांनी खानकडून हस्तगत केला होता. मात्र, हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे. 

Web Title: Actor Ejaz Khan consoles; High Court granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.