शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडचणीत, ED कडून चौकशी, मनी लॉड्रिंगप्रकरणी जबाब नोंदविण्याचं काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 6:26 PM

ED is questioning bollywood actress jacqueline fernandez in delhi : मनी लाँड्रिग प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात तिचा जबाब नोंदवला जात आहे.

ठळक मुद्देसुकेश चंद्रशेखरनिगडित एका मनी लाँड्रिग प्रकरणात ही चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात मनी लाँड्रिगची केस आहे. 

बॉलीवूड  अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय)  चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. सध्या तिची दिल्लीत ईडीच्या कार्यालयात झाडाझडती सुरु आहे. मनी लाँड्रिग प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात तिचा जबाब नोंदवला जात आहे. जॅकलिनची चौकशी होत असल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सुकेश चंद्रशेखरनिगडित एका मनी लाँड्रिग प्रकरणात ही चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात मनी लाँड्रिगची केस आहे. 

कोण आहेत सुकेश चंद्रशेखर? 

23 ऑगस्ट रोजी अंमलबजावणी संचालनालयाने चेन्नई स्थित सुकेश चंद्रशेखर आणि चित्रपट अभिनेत्री लीना पॉल यांच्या बंगल्यावर छापा टाकला, ज्यांनी तिहार जेलमधून सर्वात मोठी खंडणी (200 कोटी) वसूल केली होती. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ​​ईडीने कोस्ट रोडवरील सुकेश यांच्या बंगल्यावर छापा टाकला, त्या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये सांगितली गेली आहे. छाप्यादरम्यान कारवाई करत, ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आणि सुमारे 15 आलिशान वाहने देखील जप्त करण्यात आली.

200 कोटी खंडणी प्रकरणअलीकडेच, सुकेशने तिहार कारागृहातून एका मोठ्या व्यावसायिकाच्या पत्नीकडून सुमारे 200 कोटी रुपये उकळले होते. ज्यामध्ये आरबीएल बँकेच्या अधिकाऱ्यांसह तिहार प्रशासनातील काही लोकांना अटक करण्यात आली. ईडीने सुकेशच्या जवळची सहकारी लीना पॉलचीही चौकशी केली. सुकेशला खंडणी प्रकरणात स्पेशल सेलने अटक केली होती, तो सध्या ईओडब्ल्यूच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे, सुकेश हा AIDMK प्रतीक प्रकरणात आरोपी आहे आणि बराच काळ तुरुंगात आहे.

याआधी, पोलीस सूत्रांनी सांगितले होते की, हाय प्रोफाईल चीटर सुकेश तुरुंगातून एका मोठ्या व्यावसायिकाच्या संपर्कात होता आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात प्रकरण मिटवण्याचा दावा करून फोन करून पैसे उकळत होता. कारागृहात मोबाईल सापडल्यानंतर जेल प्रशासनाशी संबंधित काही अधिकारी रडारवर आले होते. सुकेश तीच व्यक्ती आहे, ज्याने AIADMK चे उपप्रमुख टीटीव्ही दिनाकरन यांच्याकडून 2 कोटी रुपये घेऊन निवडणूक चिन्ह मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. प्रकरण उघडकीस आल्यावर गुन्हे शाखेने सुकेशला अटक केली आणि सुकेशच्या माहितीवरून टीटीव्ही दिनाकरनलाही अटक करण्यात आली.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसraidधाडbollywoodबॉलिवूडdelhiदिल्लीChennaiचेन्नई