मुंबई : एनसीबी मुंबई झोनचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरला (Kranti Redkar) जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात क्रांती रेडकरने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रांती रेडकर हिला जीवे मारण्याच्या धमक्या आणि अश्लील मेसेज पाकिस्तानी नंबरवरून आल्या आहे. याबाबत क्रांती रेडकरने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय, तिने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.
क्रांती रेडकरने ट्विटद्वारे म्हटले आहे की, माझ्या मोबाईल नंबरवर विविध पाकिस्तानी नंबर आणि ब्रिटनमधून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हे फक्त तुमच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. हे गेल्या एक वर्षापासून होत आहे. पोलिसांना वेळोवेळी कळविण्यात आले. तसेच, क्रांती रेडकरने आपल्या या पोस्टवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई पोलिसांना देखील टॅग केले आहे.
आर्यन खान प्रकरणापासून समीर वानखेडे चर्चेतअभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. तसेच, याप्रकरणी मोठी लाच घेतल्याचा आरोप समीर वानखेडेंवर करण्यात आले. या प्रकरणात समीर वानखेडे यांची ईडी चौकशी देखील करण्यात आली. त्यानंतर समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार पोलीस स्थानकात केल्याचे सांगितले आहे.