नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही खंडणीच्या एका प्रकरणात चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचली आहे. दिल्लीच्या तिहार कारागृहातून 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी नोरा फतेहीची चौकशी केली जाईल. या प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. जॅकलीन उद्या ईडी कार्यालयात येण्याची शक्यता आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, नोरा फतेहीने पूर्वी देखील जबाब नोंदवला आहे. आधी नोंदवलेल्या जबाबामध्ये विरोधाभास आढळून आला. या आधारावर तिला पुन्हा एकदा दिल्लीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, नोरा फतेहीला या प्रकरणात साक्षीदार म्हणून पाहिले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु आज संध्याकाळपर्यंत चौकशी केल्यानंतर त्यांच्यासंदर्भातील पुढील परिस्थिती स्पष्ट होईल.
तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandra Shekhar) संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात (200 Crore Money Laundering Case) अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन बजावले आहे. नोराला समन्स जारी करत, या प्रकरणात आज चौकशीसाठी हजर होण्यास सांगण्यात आले. यासंदर्भात ED तिचा जबाब नोंदवत आहे.