मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची शुक्रवारी मालमत्ता कक्षाने साडे आठ तास चौकशी केली. गुन्हे शाखेने अभिनेत्री शर्लिन चोप्राला समन्स बजावत शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, चोप्रा हजर होताच तिच्याकडे चौकशी करण्यात आली. यावेळी महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागल्याचे समजते आहे.
मालमत्ता कक्षाने फेब्रूवारी महिन्यात पॉर्नोग्राफी प्रकरणाचा पर्दाफाश केला. याप्रकरणात आतापर्यंत अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्यासह एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. शर्लिननेही अटकेच्या भितीने अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
अशात, शुक्रवारी मालमत्ता कक्षाने समन्स बजावून हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ती हजर झाली. सोबत कागदपत्रेही होते. पोर्नोग्राफी प्रकरणात कुंद्रा आणि तिचे व्हॉट्सअप चँट व्हायरल झाले होते. यात त्यांच्या ५०-५० व्यवहाराचाही उल्लेख होता. ते नेमके कशा बद्दल आहे. तिचा यात सहभाग आहे का? आदिबाबत गुन्हे शाखेकड़ून करण्यात आला आहे. तिच्याकडे केलेल्या चौकशीत महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे समजते आहे.