शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

मुलीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या अभिनेत्रीच्या पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 5:26 AM

ठाणे येथील अभिनेत्री प्रज्ञा पारकर (४०) हिने मुलगी श्रुती (१७) हिची हत्या करून स्वत: शुक्रवारी कळव्यात आत्महत्या केली.

ठाणे : येथील अभिनेत्री प्रज्ञा पारकर (४०) हिने मुलगी श्रुती (१७) हिची हत्या करून स्वत: शुक्रवारी कळव्यात आत्महत्या केली. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. श्रुतीच्या हत्येप्रकरणी मयत प्रज्ञाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, दुसरा गुन्हा प्रज्ञाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती प्रशांतविरोधात दाखल झाला आहे. त्याला शुक्रवारी मध्यरात्री अटक केली असून १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच हे दोन्ही गुन्हे पोलीस उपनिरीक्षक विजय खिलारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारतर्फे दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.प्रज्ञा यांनी लिहिलेल्या १३ ते १५ पानी चिठ्ठीत प्रशांत सोडून माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असे स्पष्ट म्हटले आहे. तसेच चिठ्ठीच्या पान १ वर प्रज्ञा यांनी आत्महत्या करत असून श्रुतीसकट संसाराचे ओझे आता सांभाळणे नाही जमत, प्रशांत आणि नेहाचे अनैतिक संबंध जेव्हा समजले, तेव्हा २०१३ ला श्रुती फक्त सहा वर्षांची होती, असे नमूद केले आहे. तसेच पान नंबर १३ वर प्रशांतवर अवलंबून राहणे मंजूर नाही. सततचा अपमान, भांडणाला मी कंटाळले आहे. तसेच प्रशांतला नवरा म्हणत नाही. नवरेपणाचे सगळे अधिकार त्याने गमावले, असा मजकूर लिहिला आहे. तिला दिलेल्या मानसिक त्रासामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याने प्रशांतविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कळवा पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे