शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

अदानी कार्यालयातून फोन अन् अधिकाऱ्याला झटका; दोन बँक खात्यांतून पैसे गायब 

By गौरी टेंबकर | Published: February 08, 2023 1:26 PM

तक्रारदार गुर्ले रमणा (वय ४५) एअर इंडियात टेक्निकल ऑफिसर आहेत. त्यांना ५ फेब्रुवारीला व्हॉट्सॲप मेसेज आला.

मुंबई : वीजबिल न भरल्याच्या बोगस मेसेजचा झटका नुकताच एअर इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याला बसला. त्यांना ५८ हजार ९४२ रुपये गमवावे लागले. त्यांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार गुर्ले रमणा (वय ४५) एअर इंडियात टेक्निकल ऑफिसर आहेत. त्यांना ५ फेब्रुवारीला व्हॉट्सॲप मेसेज आला. त्यात ‘आपले गेल्या महिन्यातील बिल अद्ययावत झाले नसून, त्यामुळे आज रात्री आपल्या घराची वीज तोडणी केली जाईल’, असे नमूद केले होते. रमणा यांनी संबंधित क्रमांकावर फोन केला. संबंधिताने त्यांना सांगितले की, तो अदानी वीज कंपनीतून बोलत असून, वीज बिल न भरल्याने त्यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यावर बिल भरल्याचे रमणा यांनी सांगितले. तेव्हा ते अपडेट झालेले नसल्याचे सांगत त्यांना अदानी वीज कंपनीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जाण्यास सांगितले. त्यानुसार रमणा यांनी फॉलो करत क्रेडिट कार्डने १० रुपये भरले. मात्र, ते अद्याप आम्हाला मिळालेले नसून, भामट्याने रमणा यांना त्यांच्या मोबाइलवर ॲनी डेस्क ॲप व अन्य ॲप  डाऊनलोड करायला लावत पैसे न मिळाल्याचे सांगितले.  

...असे सापळ्यात अडकविले- रमणा यांना फोन पे वर जात ॲड न्यू अकाऊंट करायला लावले. एचडीएफसी बँकेचा आयएफएससी कोड देत त्यांच्या नावाने पेटीएमच्या प्रोसिड टू पे वर क्लिक करून ४७५७९ आणि रमणा यांच्या मोबाइल क्रमांकाचे शेवटचे चार अंक टाकायला लावले. - त्यानुसार त्यांच्या एसबीआय खात्यातून ४७ हजार ५७९ आणि एचडीएफसी बँक खात्यातून ९ हजार ८६९ रुपये काढण्यात आले. - रमणा यांना १ हजार ४९४ रुपये Myntra Private Limited,UPI ID Myntra.payu@ICICI यावर हस्तांतरण झाल्याचा मेसेज आला आणि वीज बिल आता अद्ययावत झाल्याचे सांगत संबंधिताने फोन ठेवला. 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस