शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

प्रशासकीय नियम धाब्यावर; लोणावळ्यात 'विकेंड'ला पर्यटनासाठी आलेल्या 69 जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 9:04 PM

प्रशासनाकडून वारंवार बाहेर न पडण्याचे आवाहन करून देखील शनिवारी व रविवारी लोणावळ्यात पर्यटनाला आले होते.

ठळक मुद्देमास्क न लावणार्‍या 44 जणांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड

लोणावळा : पर्यटनस्थळे बंद असताना देखील लोणावळ्यात फिरायला आलेल्या तब्बल 69 पर्यटकांवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवार व रविवारी विशेष कारवाई मोहिम राबवत गुन्हे दाखल करण्यात आलेे आहे. मास्क न लावता फिरणार्‍या 44 जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला.     कोरोना या आजाराचा प्रसार रोखण्याकरिता शासन स्तरावरून वारंवार सुचना दिल्या जात असताना काही नागरिक या सूचनांकडे कानाडोळा करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या सोबत मावळ तालुक्यातील 31 ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. लोणावळा व खंडाळा परिसरातील सर्व पर्यटनस्थळे बंद असताना काही पर्यटक शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात येत आहेत. मागील तिन आठवडे सातत्याने विशेष मोहिम राबवत नाकाबंदी करत पोलीस प्रशासन कारवाई मोहिम राबवत आहे. शेकडो जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरी देखिल पर्यटकांचा उन्माद पहायला मिळत आहेत.

    लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत व लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे, पोलीस हवालदार अमोल कसबेकर, जयराज पाटणकर यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी विशेष कारवाई मोहिम राबवत पर्यटनस्थळांकडे जाणार्‍या पर्यटक वाहनांवर कारवाई करत त्यांना माघारी पाठवले.     पोलीस प्रशासन असो व नगरपरिषद प्रशासन हे नागरिकांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी दिवसरात्र काम करत आहे. नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोना ही महामारी असून तीला रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी फिजिकल अंतर राखणे तसेच चेहर्‍यावर मास्क लावणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. पर्यटनस्थळे यावर्षी बंद असल्याने मुंबई पुण्यासह इतर भागातील पर्यटकांनी लोणावळ्यात येऊ नये, जे नागरिक लोणावळ्यात बंगले व फार्महाऊसमध्ये लाॅकडाऊन पुर्वी किंवा लाॅकडाऊन दरम्यान आले आहेत, त्यांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, स्थानिक नागरिकांनी बाजार भागात गर्दी करू नये, दुकानदारांनी देखील स्वतः मास्क लावावे तसेच मास्क न लावणार्‍या व्यक्तींना माल देऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व मुख्याधिकारी रवी पवार यांनी केले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtourismपर्यटनPoliceपोलिस