श्रद्धा मर्डर केसने सध्या संपूर्ण देश हादरला आहे. लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाने, या घटनेची संपूर्ण तयारी केली होती. तो ज्या श्रद्धासोबत प्रेमाचे नाटक करत होता, तिचीच त्याने एवढ्या भीषण पद्धतीने हत्या केली की, संपूर्ण घटना जाणून तुमचाही थरकाप उडेल...
मुंबईहून छत्रपूरला येऊन राहू लागलेल्या आफताबने लिव्ह इन पार्टनर श्रद्धाच्या लग्न करण्याच्या मागणीनंतर, हा कट रचला होता. एवढेच नाही, तर श्रद्धाचा मृतदेह लपविण्यासाठी त्याने 300 लिटरचे फ्रीजदेखील विकत आणले होते. तसेच, तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर त्याची दुर्गंधी पसरू नये, म्हणून तो उदबत्याही लावत होता. महत्वाची गोष्ट म्हणजे, त्याने या घृणास्पद घटनेचा कट एक अमेरिकन क्राईम शो 'Dexter' पाहून रचला होता.
श्रद्धाने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन नाते सुरूच ठेवले होते -पोलिसांनी आफताब अमीन पूनावालाला शनिवारी अटक केली आहे. आता त्याला 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. 26 वर्षीय श्रद्धा वालकरने तिच्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन आफताबसोबत आपले नाते सुरूच ठेवले होते. यामुळेच तीचे आई-वडिलांशी बोलणे होत नव्हते. अफताब आणि श्रद्धा हे दोघेही मुंबईहून दिल्लीला आले होते. फूड ब्लॉगर राहिलेल्या आफतासोबत श्रद्धाची मैत्री एका कॉल सेंटरमध्ये नोकरीदरम्यान झाली होती. दिल्लीत आल्यानंतरही श्रद्धा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असायची. यामुळे तिच्या घरच्यांना तिच्या संदर्भात माहिती मिळत होती. मात्र, 5 महिन्यांपासून मुलीसंदर्भात कसल्याही प्रकारचे अपडेट न मिळाल्याने तिच्या वडिलांनी दिल्लीत येऊन पोलिसांशी संपर्क साधला.
रोज दोन तुकडे फेकण्यासाठी जंगलात जायचा -पोलीस तपासात जे काही समोर आले आहे, ते समजल्यानंतर कुणाचाही थरकाप उडेल, कुणालाही धक्का बसेल. आफताबने 18 मे रोजीच श्रद्धाची हत्या केली होती. त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले होते. तो रोज रात्री 2 वाजताच्या सुमारास तिच्या शरिराचे दोन तुकडे मेहरौलीच्या जंगलात फेकण्यासाठी जात असत. अफताबने या हत्येचा कट अमेरिकन क्राइम शो Dexter पाहून रचला होता, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आफताबने शेफ म्हणून ट्रेनिंग घेतली होती आणि मीट कापायच्या चाकूनेच त्याने आपल्या प्रेयसीचे तुकडे केले. दक्षिण दिल्ली पोलीस इंचार्ज अंकित चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये लग्नासंदर्भात अनेक वेळा भांडण झाले होते. हा वाद वाढल्यानंतरच त्याने चाकूने श्रद्धाचे तुकडे केल.
वडिलांना कसा आला संशय - जेव्हा मुलीच्या एका मित्राने सांगितले, की श्रद्धाचा फोन गेल्या काही आठवड्यांपासून बंद आहे. तेव्हा तिच्या वडिलांना काही तरी अघटित घडल्याचा संशय आला. यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी थेट दिल्ली गाठली आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर, आफताब पकडला गेला. यानंतर, आता जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडेही सापडले आहेत. मात्र, आफताबने ज्या चाकूच्या सहाय्याने श्रद्धाची हत्या केली, तो अद्याप मिळू शकलेला नाही.