श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेला आफताब आमिन पुनावाला याची नार्को टेस्ट आज होणार होती. मात्र ही आता रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते जंगलात फेकून दिले. याप्रकरणी आफताबची चौकशी सुरु आहे. मात्र आफताब चौकशीत सतत आपली विधाने बदलत होता. पोलिसांना भरकटवण्याचे काम करत होता. ६ महिन्यांपुर्वी झालेल्या हत्येचे पुरावे कसे शोधणार हे दिल्ली पोलिसांसमोर आव्हानच आहे. यावर तोडगा म्हणून आफताबची नार्को टेस्ट करणे हाच पर्याय उपलब्ध होता.
नार्को टेस्ट रद्द का झाली?
नार्को टेस्ट करण्याआधी पॉलिग्राफ चाचणी करायची असते. तसेच इतरही काही चाचण्या करणे आवश्यक आहे. मात्र आफताबच्या पॉलिग्राफ चाचणीसाठी कोर्टाने अद्याप परवानगी दिलेली नाही. तसेच परवानगी मिळवण्यासाठी आणखी १० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परवानगी मिळेपर्यंत आफताबची नार्को टेस्ट करता येणार नाही.