मुंबई - १९९१ मधील नालासोपाराच्या वडराई गावातील चांदी तस्करी प्रकरणातील सराईत आरोपीला तब्ब्ल 15 वर्षानंतर पकडण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत अण्णा पाटील (वय - ६०) उर्फ चरण पालकर असं या आरोपीचे नाव आहे. मागील कित्येक वर्षापासून तो बेळगावमध्ये नाव बदलून रहात होता.
नालासोपारा येथील वडराई गावात भाई ठाकूरच्या आदेशाने १९९१साली चांदीने भरलेले जहाज परदेशातून आले होते. त्यावेळी समुद्रातील खडकाला जहाज धडकल्याने ते जहाज समुद्र किनारी पाण्यात बुडाले होते. याची माहिती मिळताच वडराई गावातील नागरिकांनी जहाजातील चांदी लुटली. त्याचाच राग म्हणून भाई ठाकूरच्या हस्तकांनी वडराई गावातील नागरिकांना ञास देण्यास सुरूवात केली. त्यावेळी गावातील काही रहिवाशांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. तर काहींना जीवंत पेटवले होते. या संघठित गुन्हेगारीत आरोपी चंद्रकांत पाटीलचा देखील सहभाग होता. या प्रकरणात पोलिसांनी पाटीलला अटक केल्यानंतर 1997 मध्ये तो जामीनावर सुटल्यानंतर फरार झाला. त्यानंतर दिल्लीतील सुभाषसिंग टोळीसोबत तो काम करत होता. त्यावेळी दिल्लीत शस्ञासाठ्यासह दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. दिल्ली पोलिसांनी त्याच्या विरोधात टाडा कायद्यांतर्गत अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 10 वर्षाची शिक्षा सुनावली होती.
माञ, चांदी तस्करी प्रकरणात पाटीलचा ताबा नालासोपारा पोलिसांनी घेतल्यानंतर पाटील जामीनावर पुन्हा बाहेर आला. त्यानंतर पाटील पुन्हा न्यायालयात हजर झाला नाही. त्यानंतर पाटील छोटा राजनच्या टोळीसाठी काम करू लागला. याचदरम्यान नालासोपारातील एका जमिन व्यवहारावरूऩ राजनचे विकासक राजेंद्र पतंगे यांच्याशी वाद सुरू होता. हा वाद टोकाला गेल्यानंतर राजनने त्याच्यावर साथीदारांमार्फत गोळीबार करत त्याची हत्या केली. या प्रकरणातही पाटीलचा सहभाग असल्याने पोलिस शोध घेत असल्याचे कळाल्यानंतर पाटील आपली खरी ओळख लपवून चरण पालकर या नावाने बेळगावमध्ये स्थायिक झाला. कालांतराने बेळगावात इस्टेट एजंट म्हणून काम करू लागल्यानंतर त्याचे नालासोपारा आणि बोरिवलीत कामानिमित्त येणं - जाणं वाढले होते. याबाबत गुन्हे शाखेच्या कक्ष - 11 चे वरिॆष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव याना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला तब्बल 15 वर्षानंतर अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त निसार तांबोळी दिली.