मुंबई : पॅरोलवर बाहेर आल्यानंतर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून मुंबईत त्याच्या विरुद्ध ३ गुन्हे नोंद आहेत.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी गेल्या वर्षी २६ जून रोजी पँरोलवर बाहेर आला. त्यानंतर ६ सप्टेबर रोजी घाटकोपरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन केले. याप्रकरणी त्याच्या विरोधात पार्क साईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो ओळख लपवून वावरत होता. अखेर तो पुण्यात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या कक्ष १ ने मंगळवाऱी सापळा रचून त्याला बेडया ठोकल्या. त्याच्या विरोधात पंतनगर, पार्क साईट तसेच चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहे. पुढील तपासासाठि त्याचा ताबा पार्क साईट पोलिसांना देण्यात आला आहे. याप्रकरणी पार्क साईट पोलीस अधिक तपास करत आहेत.