शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

पतीच्या तोंडून निघालं 'असं' वाक्य; पत्नीने ४ दिवसांनी घेतला भयानक बदला, आधी... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 2:24 PM

पत्नीचा चेहरा झाकलेला होता. केवळ डोळेच दिसत होते जेणेकरून तिला कुणी ओळखू नये.

एका महिलेने तिच्या पतीला भयानक शिक्षा दिली आहे. पतीने पत्नीला बोललेल्या एका वाक्यामुळे भडकलेल्या पत्नीने त्याचा बदला घेतला. या महिलेने उकळतं पाणी पतीवर फेकले. त्यामुळे पतीच्या कमरेवरील त्वचा पूर्णत: भाजली. २८ वर्षीय रहिमा निस्वा या आरोपी पत्नीला या प्रकारामुळे ८ महिन्याची जेलची शिक्षा झाली आहे. 

साऊथ चाइना मॉर्निंग पोस्ट रिपोर्टनुसार, रहिमा आणि तिचा पती मोहम्मद रहिमी शामिर अहमत साफौन यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. ज्यामुळे या दोघांना वेगवेगळे राहावे लागत आहे. रहिमी ही मूळची मलेशियाची असून सिंगापूरची रहिवासी आहे. तर त्याची पत्नी रहिमा तिच्या माहेरी इंडोनेशियात राहायला आहे. या दोघांच्या लग्नाला ५ वर्ष झाली. परंतु डिसेंबर महिन्यापासून त्या दोघांच्या नात्यात खटके उडायला लागले. 

रहिमाने ४ दिवसांनी घेतला बदलाएकेदिवशी रहिमाने पत्नी आणि सासू यांच्या चर्चेवेळी पहिल्यांदा घटस्फोटाबाबत विधान केले होते. तेव्हा पत्नीने विरोध केला नाही. ना ती नाखुश होती. परंतु काही दिवसांनी २२ मार्च रहिमी सिंगापूरला आली होती. त्याठिकाणी पतीच्या घराची रेकी केली त्यानंतर एका मित्रासोबत हॉटेलमध्ये थांबली. मग २३ मार्च रोजी सकाळी हॉटेलमधून गरम पाणी आणले. ती सकाळी ७.२० मिनिटांनी पतीच्या घरी पोहचली. त्याने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. चेहरा झाकलेला होता. केवळ डोळेच दिसत होते जेणेकरून तिला कुणी ओळखू नये. पती ७ वाजून ३० मिनिटांनी जेव्हा घराबाहेर निघाला, बूट घालण्यासाठी तो पायऱ्यांवर बसला होता. तेव्हा रहिमी पतीच्या दिशेने धावत गेली आणि उकळतं पाणी त्यांच्या अंगावर फेकले. त्यानंतर तिने तिथून पळ काढला. या घटनेत पती तडफडत होता. त्याने शर्ट काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पतीला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

कोर्टाच्या दस्तावेजात गुन्ह्यामागचे कारण सांगितले नाही. त्यानंतर रहिमा तिच्या मित्राला भेटली आणि दोघे इंडोनेशियाला पळाले. पोलिसांनी या घटनेत आरोपी पत्नीला अटक केली. कोर्टात सुनावणीवेळी तिने पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. माझ्या मुलांसाठी मी काहीही करायला तयार आहे असं तिने कोर्टाला सांगितले.