अहमदनगर : एखाद्या थ्रिलर चित्रपटाच्या कथानकाला साजेल अशा पद्धतीने नगर पोलिसांनी हैदराबाद येथे कारवाई करून १०० दिवसांपासून फरार आरोपी बाळ बोठे याच्या मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या. बोठे याने रेखा जरे यांची का हत्या केली, हे रहस्यही आता उलगडणार आहे. (After keeping an eye on the punter in the town, the police reached Bothe)बोठे याने यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे सुपारी देऊन ३० नोव्हेंबर रोजी हत्याकांड घडवून आणले होते. पोलीस तपासात बोठे याचे नाव समोर येताच तो नगरमधून पसार झाला. त्याला अटक करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मागील तीन महिने दहा दिवसांपासून पोलिसांनी महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगढ, रायपूर, भोपाळ आदी १०० ठिकाणी बोठेचा शोध घेतला. तो मात्र प्रत्येक वेळी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. बोठे फरार झाल्यानंतर तो त्याचा नगरमधील खास पंटर महेश वसंतराव तनपुरे याच्या संपर्कात होता. शेवटी पोलिसांनी याच तनपुरेवर नजर ठेवून बोठे याचा ठावठिकाणा शोधला. यासाठी नगरची सायबर टीम, मोबाइल सेल, मुंबई येथील सायबर पोलीस यांचीही मदत घेण्यात आली. ठावठिकाणा मिळाल्यानंतर नगर पोलिसांचे सहा पथके हैदराबाद येथील बिलालनगरमध्ये दाखल झाले. त्या ठिकाणी पाच दिवसांत शोधमाेहीम राबविली. प्रथम तीन वेळा बोठेने पोलिसांना गुंगारा दिला. शेवटी सूत्रबद्धरीत्या नियोजन करत पोलिसांनी बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या पाच जणांना जेरबंद केले.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, निरीक्षक यादव, संभाजी गायकवाड, ज्योती गडकरी, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, मिथुन घुगे, दिवटे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, हेड कॉन्स्टेबल रवींद्र पांडे, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, प्रकाश वाघ, पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, राहुल गुंडू, अभिजित अरकल, जयश्री फुंदे, संजय खंडागळे, संतोष लोढे, गणेश धुमाळ, सचिन वीर, सत्यम शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
नगरचा ‘बीबी’ हैदराबादमध्ये झाला बी.बी. पाटीलहैदराबाद येथील गुन्हेगारांचे आश्रयस्थान असलेल्या बिलालनगर येथे बोठे याने तेथील वकील जर्नादन अकुला चंद्राप्पा याच्या मदतीने आश्रय घेतला होता. उस्मानिया विद्यापीठातून पीएच.डी. मिळविण्याच्या निमित्ताने बोठे हा चंद्राप्पा याच्या संपर्कात आला होता. त्यामुळे या दोघांची जुनी ओळख होती. नगरमध्ये ‘बीबी’ नावाने परिचित असलेल्या बोठे याने हैदराबाद येथे बी.बी. पाटील हे नाव धारण केले होते. याच नावाने त्याने तेथील हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. ओळख लपविण्यासाठी त्याने दाढीही वाढविली होती.
बोठेला मदत करणारी ‘ती’ महिला कोण?हैदराबाद येथे बोठे याला पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी या महिलेने मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. अनंतलक्ष्मी मात्र फरार असून पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे. तिने बोठे याला कशा पद्धतीने मदत केली, याचा पोलीस शोध घेत आहेत.
बोठे याने वापरला कुख्यात गुन्हेगाराचा मोबाइलफरार झाल्यानंतर बोठे याने संपर्कासाठी जो मोबाइल वापरला होता तो मोबाइल २०१८ मध्ये एका कुख्यात गुन्हेगाराने वापरल्याचे समोर आले आहे. त्या अनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.बोठेला मदत करणारे इतरही रडारवरफरार होताना व फरार झाल्यानंतर बोठे याला कुणी व कशी मदत केली, याचाही शोध पोलिसांनी सुरू केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
तनपुरेशी संपर्क ठरला घातकफरार झाल्यानंतर बोठे हा त्याचा नगर येथील खास पंटर महेश तनपुरे याच्या संपर्कात होता. तनपुरे हा बोठे याला नगरमधून सर्व मदत पुरवीत होता. दोन दिवसांपूर्वी बोठे आणि तनपुरे यांचा संपर्क झाला हाेता. बोठे याच्याकडील पैसे संपल्याने तनपुरे त्याला पैसे पाठविणार होता. दरम्यान पेालिसांची नजर तनपुरेवर होती. तनपुरेच्या संपर्कातूनच पोलीस बोठेपर्यंत पोहोचले.- पोलीस तपासात बोठे याचे नाव समोर येताच तो नगरमधून पसार झाला. त्याला अटक करण्याचे पोलिससमोर मोठे आव्हान होते.- मागील तीन महिने दहा दिवसांपासून पोलिसांनी महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगढ, रायपूर, भोपाळ आदी १०० ठिकाणी बोठेचा शोध घेतला. बोठे हा आमच्या कुटुंबाच्या संपर्कात होता. मात्र, त्यानेच घात करत माझ्या आईची हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक करावी यासाठी मी व माझे वकील ॲड. एस.एस. पटेकर सतत पाठपुरावा करत होतो. अखेर पोलिसांनी त्याला अटक केल्याचे समाधान आहे. या आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, हीच आता आमच्या कुटुंबीयांची अपेक्षा आहे.- रुणाल जरे.