ही घटना ७ जुलै रोजी घडली. कोतवाली परिसरातील बृजपूर खेड्यात राहणारी ज्योती पती रोहितसह किरातपूरहून घरी परतत होती. त्यानंतर गोपालपुर गावाजवळ अंगौथा येथे राहणारा भाऊ गुलशन, चुलत भाऊ राघवेंद्र उर्फ राघव आणि रघुराई यांनी हल्ला केला.सख्ख्या भावाने त्याच्या चुलतभावांसोबत ज्योतीला एकामागून एक अशा सहा गोळ्या झाडल्या, त्यानंतर भाऊ रोहितला त्यांना मारायचे नव्हते, तर त्याला अपंग करायचे होते. त्याला दोन गोळ्या लागल्या. यामुळे रोहित जखमी झाला, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुन्हा केल्यावर आरोपी पळून गेले. तिन्ही आरोपींच्या अटकेनंतर एसपी अजय कुमार पांडे यांनी गुरुवारी खुनाचा खुलासा केला. त्याने सांगितले की, चुलत भाव राघवेंद्र अविवाहित आहे. दुसर्या जातीतल्या तरूणाशी ज्योतीने लग्न केल्यामुळे राघवेंद्रचे देखील लग्न होत नव्हते.रोहित हा दुसर्या जातीचा आहे. ज्योती आणि रोहितचे वर्षभरापूर्वी लग्न झाले. ज्योतीच्या सख्ख्या भावांनी ही हत्या करण्याचा कट आखला. अटक केलेल्या तीन आरोपींनी कबुली दिल्यानंतर तुरुंगात पाठविण्यात आले आहे, असे एसपी म्हणाले. गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पथकाला 20 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल
गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा
अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार
...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'
मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला
पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचं लैंगिक शौषण, विकृत प्रकार आला समोर
crime