Crime News : छत्तीसगढच्या कोरबामध्ये 20 वर्षीय तरूणीची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रूममध्ये पडला होता. पोस्टमार्टम करण्यात आलं तेव्हा समजलं की, आरोपीने 51 वेळा धारदार हत्याराने तिच्या शरीरावर वार केला होते.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला राजनांदगांव येथून अटक केली. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी 1000 हजार सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज चेक केले. त्यानंतर बॅंक अकाऊंट चेक केलं. पोलिसांनी सांगितलं की, तरूणीची हत्या लव्ह ट्रायगंलमुळे झाली. आरोपीच्या बॅंक डिटेल्समुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले.
पोलिसांनी सांगितलं की, हत्या केल्यानंतर आरोपी अहमदाबादला गेला. हत्या करण्याआधी त्याने शारीरिक संबंध ठेवले. तरूणीच्या हत्येच्या चौकशीतून समजलं की, आरोपीने आधी उशीने तिचं तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंतर हत्याराने तिच्या शरीरावर अनेक वार केले. आरोपीने तिच्या छातीवर, गळ्यावर, चेहऱ्यावर आणि पाठीवर अनेक वार केले.
पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, तरूणीच्या छातीवर, गळ्यावर, चेहऱ्यावर आणि पाठीवर एकूण 51 वार केले आहेत. घटनेदरम्यान तरूणीने बचाव करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे तिच्या हातावरही जखमा आहेत. आरोपीने तरूणीचं तोंड दाबलं होतं, जेणेकरून ती आरडाओरड करू नये.