बलात्कारानंतर तरुणी राहिली गरोदर, लग्नाचं आश्वासन देऊन केला गर्भपात, आरोपी निघाला विवाहित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:38 IST
Rape Case : अश्लील व्हिडीओ बनवल्यानंतर आरोपी सतत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहे.
बलात्कारानंतर तरुणी राहिली गरोदर, लग्नाचं आश्वासन देऊन केला गर्भपात, आरोपी निघाला विवाहित
दिल्लीतील सागरपूरमध्ये तरुणीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने मुलीवर अनेकवेळा बलात्कार केला आणि नंतर गर्भपात करून घेतला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सागरपूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला तिच्या कुटुंबासह पश्चिम सागरपूर परिसरात राहते. तक्रारीत म्हटले आहे की, तरुणीची नारायणा परिसरात राहणाऱ्या रणदीप नावाच्या व्यक्तीशी भेट झाली होती. त्यानंतर मुलाने फसवणूक करून तिचा अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला होता.अश्लील व्हिडीओ बनवल्यानंतर आरोपी सतत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहे. तशी धमकी देऊन त्याने मुलीवर अनेकवेळा बलात्कार केल्याची घटना घडली. अनेकवेळा बलात्कार केल्यानंतर मुलगी गरोदर राहिल्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन देऊन मुलीचा गर्भपात केला.दरम्यान, आरोपी विवाहित असल्याचे पीडितेला समजले. ही गोष्ट त्याने मुलीपासून लपवून ठेवली. यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. सध्या आरोपी फरार आहे.