ढाका: बांगलादेशातहिंदूंच्या ६६ घरांची नासधूस करण्यात आली आणि जवळपास 20 घरे जाळण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात दुर्गा पूजेदरम्यान मंदिर तोडफोडीच्या घटनांनंतर कथित निंदनीय मीडिया पोस्टवरून बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. बीडीन्यूज24 डॉट कॉमच्या अहवालानुसार हा हल्ला रविवारी रात्री उशिरा राजधानी ढाकापासून 255 किमी अंतरावर असलेल्या गावात झाला.जिल्हा पोलीस अधीक्षक मोहम्मद कमरुज्जमां यांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, गावातील एका तरुण हिंदू माणसाची फेसबुक पोस्ट "धर्माचा अपमान करणारी" असल्याच्या अफवांमुळे तणाव वाढल्यानंतर पोलीस मच्छिमारांच्या वसाहतीत पोहोचले. अहवालात म्हटले आहे की, पोलीस त्या व्यक्तीच्या घरावर पहारा देत असताना हल्लेखोरांनी जवळच्या इतर घरांना आग लावली.अग्निशमन सेवा नियंत्रण कक्षाने सांगितले की, घटनास्थळावरून मिळालेल्या त्यांच्या अहवालात असे सूचित करण्यात आले की 29 रहिवासी घरे, दोन स्वयंपाकघर, दोन धान्याचे कोठारे आणि 15 वेगवेगळ्या लोकांचे 20 गवतांच्या साठवणीच्या जागा पेटल्या आहेत. अग्निशमन सेवेला रात्री 8:45 वाजता आगीची माहिती मिळाली आणि पहाटे 4:10 वाजता आग आटोक्यात आली. जीवितहानी झाल्याचे तात्काळ वृत्त नव्हते.बांगलादेशच्या चटगांव विभागातील कुमिला येथील दुर्गा पूजेच्या ठिकाणी निंदा केल्याच्या कथित घटनेनंतर जातीय तणाव वाढला आहे, ज्यामुळे हिंदू मंदिरे आणि कमिल्ला, चांदपूर, चॅटोग्राम, कॉक्स बाजार, बंदरबन, येथील मंदिरांवर हल्ले झाले. मौलवी बाजार, गाझीपूर, चापैनवाबगंज, फेनी आणि इतर जिल्ह्यांमध्ये तोडफोड आणि पोलिसांशी चकमक झाली. सोशल मीडियावर हल्ला आणि जातीय द्वेष पसरवणाच्या आरोपाखाली डझनभर लोकांना अटक करण्यात आली आहे, असे अहवालात म्हटले आहे.
बांगलादेशात दुर्गापूजेच्या हिंसाचारानंतर आता हिंदूंच्या 20 घरं दिली पेटवून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 8:47 PM
Hindu houses vandalised : अग्निशमन सेवेला रात्री 8:45 वाजता आगीची माहिती मिळाली आणि पहाटे 4:10 वाजता आग आटोक्यात आली.
ठळक मुद्देमौलवी बाजार, गाझीपूर, चापैनवाबगंज, फेनी आणि इतर जिल्ह्यांमध्ये तोडफोड आणि पोलिसांशी चकमक झाली.