मुंबईंतील अंधेरी येथे एका 54 वर्षांच्या महिला आयुर्वेद डॉक्टरसोबत 7 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, मुकेश अंबानी यांच्या डीप फेक व्हिडिओच्या सहाय्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. इंस्टाग्रामवरील या व्हिडिओमध्ये ते 'राजीव शर्मा ट्रेड ग्रुप' संदर्भात बोलताना दिसत आहेत. या फेक व्हिडिओमध्ये अंबानी, लोकांना अधिक परताव्यासाठी या कंपनीची बीसीएफ इंव्हेस्टमेंट अॅकेडमी ज्वॉइन करा, असे सांगताना दिसत आहेत.
मुंबईच्या डॉक्टर केके एच पाटिल यांच्यासोबत ही फसवणूक 28 मे ते 10 जून दरम्यान झाली. या कालावधीत त्यांनी 16 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण 7 लाख रुपये पाठवले. यानंतर त्यांना अधिक परतावा आणि अंबानींकडून प्रमोशनचे अमिश देण्यात आले.
महिला डॉक्टरला अशी आली फसवणुकीची शंका - माध्यमांतील वृत्तांनुसार, संबंधित महिला डॉक्टरला 7 लाख रुपये गमावल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ट्रेडिंग वेबसाइटवर त्यांना 30 लाख रुपयांचा नफा झाल्याचे दिसत होते. मात्र, त्यांना पैसे काढता येत नव्हता. यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचा संशय आला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या फसवणुकीसाठी गुंडांनी डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. संबंधित महिलेने ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले होते ते खाते बंद करण्यात आले आहे.
मुकेश अंबानी यांचा असा दुसरा व्हिडिओ... -खरे तर, हा मुकेश अंबानी यांचा अशा प्रकारचा दुसरा डीप फेक व्हिडिओ आहे. यापूर्वी, मार्च महिन्यात त्यांचा असाच एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हडिओमोध्ये ते स्टॉक ट्रेडिंग मेंटरशिप प्रोग्रॅमसंदर्भात बोलताना दिसत होते. हा व्हडिओ एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आला होता. यात, लोकांनी 'स्टूडन्ट विनिट' पेज फॉलो करायला हवे. येथे इंटरनेट यूजर्सना मोफत इंव्हेस्टमेंट अॅडव्हाइस मिळू शकते, असे सांगण्यात आले होते.