नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एक भय़ंकर घटना समोर आली आहे. मंदिर परिसरात एका साधूची धारदार शस्त्राने अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यमुना नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या जंगलात एक हनुमानाचं मंदिर बांधलं गेलं आहे. या मंदिरात मृत साधू शिव गिरी पूजा पाठ करायचं काम करत होते, तसेच ते मंदिराच्या आवारातच राहत असत.
साधूच्या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिराच्या आवारात त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन अज्ञातांनी त्यांची निर्घृण हत्या केली आहे. स्थानिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रक्ताच्या थारोळ्यात साधू मंदिर परिसरात पडले होते. स्थानिकांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या साधूची हत्या कोणी केली आणि का केली? याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
आग्रा सीटीचे एसपी रोहन पी बोत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधूची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तसेच आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयारी केली आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. आम्ही सध्या या हत्येमागील गुढ शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. तसेच मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक्स टीमलाही पाचारण केलं आहे.
चोरी किंवा लुटमारीच्या हेतुने ही हत्या झाल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे कोणी तरी ओळखीच्या व्यक्तीने ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. या हत्येचा खुलासा करण्यासाठी सर्व्हिलन्सची टीमलाही तैनात केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. दंगल गर्ल गीता आणि बबीता फोगट (Geeta and Babita Phogat Sister) यांच्या मामे बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुस्तीच्या सामन्यात पराभव झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
धक्कादायक! दंगल गर्ल बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या; कुस्तीत पराभव झाल्याने उचललं टोकाचं पाऊल
कुस्तीच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव ती स्वीकारू शकली नाही. त्यामुळे तिने सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. संबंधित महिला कुस्तीपटू गेल्या अनेक वर्षांपासून आपले महाबीर पैलवानच्या यांच्या घरी कुस्तीचा सराव करत होती. बबीता फोगाटच्या 17 वर्षीय मामे बहिणीचं नाव रितिका असं आहे. ती राजस्थानच्या झंझनू जिल्ह्यातील जैतपूर या गावातील रहिवासी आहे. मृत रितिका द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महाबीर पैलवान यांच्या कुस्ती अॅकॅडमीत गेल्या अनेक वर्षांपासून सराव करत होती. काही दिवसांपूर्वी रितिकाने भरतपूरच्या लोहागड स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभव पत्करावा लागला.