अहमदाबाद: एका २२ वर्षीय दलित तरुणाला टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदाबादच्या ग्रामीण भागात घडली आहे. पिळदार मिशी ठेवल्यानं तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.दलित तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी ऍट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत एकूण दहा जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यापैकी चार जण अज्ञात आहेत. टोळक्यानं केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणावर शिव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर सोमवारी विरामगाम ग्रामीण पोलिसांनी एफआयआर दाखल केला.काय सांगता? अंत्यसंस्कार झाले, पिंडदानही केलं अन् १० दिवसांनी 'तो' जिवंत परतलासुरेश वाघेला असं पीडित तरुणाचं नाव असून तो कराकथल गावचा रहिवासी आहे. अहमदाबादमधील साणंद जीआयडीसीमधील व्होल्टास कंपनीत तो कार्यरत आहे. धामा ठाकोर, कौशिक वालंद, अत्रिक ठाकोर, संजय ठाकोर, आनंद ठाकोर, विजय ठाकोर अशी आरोपींची नावं आहेत. हे सगळे कराकथल गावचेच रहिवासी आहेत.माहेरी जाताना नवऱ्याला बाईक थांबवायला सांगितली, सासू अन् मुलीसमोर नदीत उडी घेतली; अन्...या प्रकरणी सुरेश वाघेला यांनी पोलीस तक्रार दाखळ केली आहे. 'रविवारी रात्री १० च्या सुमारास जेवण झाल्यानंतर माझे पालक झोपायला गेले. त्यानंतर मला धामा यांच्याकडून फोन आला. मिशी का ठेवतोस असा सवाल त्यानं विचारला. पुढच्या काही मिनिटांमध्ये धामा आणि इतर नऊजण माझ्या घरी आले. त्यांनी मला काठ्यांनी आणि रॉडनं मारहाण केली. त्यांनी शिवीगाळ करत माझ्यावर हल्ला केला,' असा जबाब त्यानं पोलिसांना दिला.
मिशी का ठेवतोस? दलित तरुणाला टोळक्याकडून काठी, रॉडनं जबर मारहाण; डोक्याला दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 12:49 PM