अहमदाबादमधील (Ahmedabad) एका तरूणाने चार लग्ने केली, पण एकही लग्न फार काळ टिकू शकलं नाही. अशात त्याने मोठ्या अपेक्षेने पाचवं लग्न केलं. पण यावेळी त्याची फसवणूक झाली. त्याची पत्नी घरातून दीड लाख रूपये आणि दागिने घेऊन फरार झाली. या घटनेमुळे तरूण इतका वैतागला की, त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी ७ लोकांवर गुन्हा दाखल केला आणि चौकशी सुरू केली.
तरूणाची याआधी चार लग्ने केली होती. पण प्रत्येकवेळी काहीना काही कारणाने चारही लग्ने मोडली. पाचवं लग्न मुंबईतील नालासोपारा येथे राहणाऱ्या एका तरूणीसोबत केलं. तरूणी लग्नानंतर काही दिवसातच दीड लाख रूपये आणि दागिने घेऊन फरार झाली. ज्यानंतर तरूणी विष पिऊन आत्महत्या केली. तरूणाजवळ एक सुसाइड नोट सापडली, ज्या त्याने सात लोकांची नावं लिहिली आहेत.
अहमदाबादच्या असलालीमध्ये मृत तरूणाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ती म्हणाली की, तिचा मुलगा आणि परिवार एकत्र राहत होते. एक दिवस त्याची आई त्याच्या रूमची साफसफाई करत होती. तेव्हाच मुलाच्या उशीखाली तिला एक चिठ्ठी सापडली. ज्यात लिहिलं की, 'राजू भाई, आशा, अश्विन वलसाड, राणी, राणी आई यांनी मला खूप त्रास दिला'.
मृतकाच्या आईने सांगितलं की, त्याची पत्नी पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली. त्यानंतर तो तणावात आला होता आणि यातच निराशेत त्याने विष पिऊन आत्महत्या केली. चिठ्ठीत ज्यांनी नावं लिहिली आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.