शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

धक्कादायक! हनी ट्र्रॅपमध्ये अडकला हवाई दलाचा जवान; हेरगिरीच्या आरोपाखाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 9:22 AM

पोलिसांनी आरोपी देवेंद्र शर्मा यांना सहा मे रोजी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे अटक केली.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने भारतीय हवाईदलाच्या एका जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. देवेंद्र शर्मा असे आरोपीचे नाव आहे. देवेंद्र शर्मा यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून हवाई दलाशी संबंधित काही संवेदनशील माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्यचा आरोप आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, कोण-कोणत्या ठिकाणी किती रडार तैनात आहे, यापासून ते उच्चाधिकाऱ्यांची नावे आणि त्याच्या पत्त्यांपर्यंत आरोपीकडे विचारणा करण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपी देवेंद्र शर्मा यांना सहा मे रोजी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे अटक केली. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र शर्मा यांना धौला कुआं येथून अटक करण्यात आली आहे. ते मुळचे कानपूर येथील आहेत.

देवेंद्र शर्मा यांची एका महिला प्रोफाईलसोबत फेसबूकवर मैत्री झाल. यानंतर त्यांना फोन सेक्सच्या माध्यमाने ट्रॅपमध्ये घेण्यात आले आणि नंतर त्यांच्याकडून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित महिला ज्या क्रमांकावरून देवेंद्र शर्मा यांच्यासोबत बोलत होती, तो भारतीय सर्व्हिस प्रोव्हायडरचा  नंबर आहे. 

पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत. एवढेच नाही, तर या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचाही संशय आहे. एवढेच नाही, तर पोलिसांना आरोपीच्या पत्नीच्या बँक अकाउंटमध्ये संशयास्पद ट्रांझेक्शनही आढळून आले आहेत.  

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसairforceहवाईदल