कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना त्याचे दोन तुकडे झाले. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये वैमानिक दीपक साठे यांचाही समावेश आहे. या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांची कुटुंबीयांची नागपूरला जाऊन त्यांच्या निवास्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले.
केरळमधील कोझिकोड विमानतळावर (Kozhikode Airport) दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी भीषण अपघात झाला. (Air India Plane Crash) या घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. यात दोन वैमानिकांचा समावेश असून 100 वर लोक जखमी झाले आहेत. या विमानात एकूण 190 प्रवासी होते. हे विमान धावपट्टीवरून घसरून 35 फूट दरीत कोसळले आणि त्याचे दोन तुकडे झाले. या अपघातेचे चित्र कुणाच्याही मनात धडकी भरवणारे आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव वाचला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!
Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन
खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या
सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी
सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा
Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग
भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी