शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

ऐरोली गोळीबार: पित्याला मुलांपेक्षा होती संपत्ती प्रिय; थकबाकी भरण्यास सांगितल्याने घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 9:16 AM

गोळीबारात बचावलेल्या सुजयने काही वर्षांपूर्वी वडिलांच्या बँक खात्यातून परस्पर ४ लाख रुपये काढले होते. याचा राग भगवान यांच्या मनात होता. सोमवारी विजयसोबत भांडण सुरू असताना सुजयदेखील तिथे उपस्थित होता. त्यामुळे सुजयवरदेखील जुना राग काढत गोळी झाडली.

- सूर्यकांत वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वतःच्या दोन मुलांवर गोळीबार करणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मुलांपेक्षा संपत्ती अधिक प्रिय होती. त्यांना महिन्याचे दीड लाखाहून अधिक उत्पन्न येत असतानाही कुटुंबाच्या गरजा भागवण्यात हात आखडता घेण्याची सवय होती. यातूनच स्वतः वापरत असलेल्या गाडीच्या दुरुस्ती व इन्शुरन्सचे पैसे थकीत ठेवले होते. याबाबत मुलाने ऐकवल्याच्या रागातून त्यांनी गोळी झाडल्याचे उघड झाले. 

निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील यांनी स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्याची घटना सोमवारी संध्याकाळी ऐरोलीत घडली. यामध्ये दोन गोळ्या लागल्याने विजय याचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसरा मुलगा सुजय याची प्रकृती स्थिर आहे. भगवान हे ऐरोली सेक्टर ३ येथे पत्नी, मोठा अपंग मुलगा अजय, त्याची पत्नी व दोन मुले यांच्यासह राहायला आहेत. दहा वर्षांपूर्वी ते नवी मुंबई पोलीस दलाच्या सुरक्षा शाखेतून निवृत्त झाले असून त्यापूर्वी रबाळे, तुर्भे पोलीस ठाण्यात त्यांनी काम केलेले आहे. त्यांचा मधला मुलगा विजय हा वसईला व लहान मुलगा सुजय हा ऐरोलीतच काही अंतरावर राहायला आहे. 

भगवान यांनी स्वतः वापरत असलेल्या इनोव्हा कारच्या दुरुस्तीचे व इन्शुरन्सचे सुमारे १२ हजार रुपये थकवले होते. पोलिसाचा रुबाब झाडून बिलाचे पैसे थकीत ठेवण्याची त्यांना सवय असल्याची चर्चा परिसरात आहे. यामुळे त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीसाठी अनेक जण मुलांना फोन करायचे. अशाच प्रकारातून गाडीच्या विम्याच्या व दुरुस्तीच्या थकीत पैशासाठी संबंधिताने विजयला फोन केला होता. त्यावरून विजयने वडिलांना फोन करून थकीत पैसे भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी त्याला घरी बोलावले होते. त्यानुसार संध्याकाळी विजय हा वसईवरून ऐरोलीला आला असता झालेल्या भांडणातून भगवान यांनी विजयवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर घरातच उपस्थित असलेल्या सुजयवर देखील गोळी झाडली. परंतु ती गोळी सुजयच्या पोटाला घासून गेल्याने तो बचावला. 

घरखर्चात आखडता हात भगवान यांची खारघर, ऐरोली व इतर ठिकाणी घरे असून ती भाड्याने दिलेली आहे. यातून त्यांना महिना दीड लाखाहून अधिक उत्पन्न मिळते. परंतु घरखर्चासाठी पत्नीला केवळ महिना १५ ते १७ हजार रुपये दिले जायचे. त्यामुळे घरखर्च भागवण्यास त्यांची पत्नी व मोठी सून जेवणाचे डबे पुरविण्याचे काम करतात. 

सुजयवरही होता जुना राग गोळीबारात बचावलेल्या सुजयने काही वर्षांपूर्वी वडिलांच्या बँक खात्यातून परस्पर ४ लाख रुपये काढले होते. याचा राग भगवान यांच्या मनात होता. सोमवारी विजयसोबत भांडण सुरू असताना सुजयदेखील तिथे उपस्थित होता. त्यामुळे सुजयवरदेखील जुना राग काढत गोळी झाडली.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिस