लोकमत न्यूज नेटवर्कपिपंरी : हिंजवडी पोलिसांनी हातभट्टी विकणाऱ्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेत अकरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात लाखोंचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
हिंजवडीतील शिवांजली कॉलनीजवळ हातभट्टी विकल्याप्रकरणी ज्योती अविनाश मारवाडी (वय ३०), पायल येशू मारवाडी (२६, दोघे रा. नेरे, दत्तवाडी, शिवांजली कॉलनी, हिंजवडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माणमधील पारखे वस्तीजवळ नदीपात्रालगत केलेल्या कारवाईत हातभट्टी तयार करण्याचे रसायन जप्त करण्यात आले. याप्रकरणी बाबू कुब्या राठोड (रा. चांदेगाव, मुळशी) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
साखरे वस्तीतील पत्र्याच्या शेडमधून ७५ हजार ९३० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. गणेश पांडुरंग थोरात (वय ३८, रा. सदाशिव कॉलनी, थेरगाव), जांभूळकर (पूर्ण नाव-पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. माणमधील पारखे वस्तीजवळील नदीपात्रालगत पावणेदोन लाखांचे हातभट्टीचे रसायन पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी दोघा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बावधनमधील कृष्णा कॉम्प्लेक्सच्या वाहनतळामधून ५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी श्याम द्वारकानाथ शेळके (वय ३५, रा. बावधन) याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
रसायन केले जप्तनेरे गावकडे जाणाऱ्या रस्त्यावर कालव्यानजीक २ लाख पाच हजार रुपये किमतीची हातभट्टी आणि हातभट्टी तयार करण्याचे रसायन जप्त केले. त्यात ७० लिटर हातभट्टी आणि तीन हजार लिटर हातभट्टीचे रसायन आहे. अविनाश मारवाडी (वय ३५), ज्योती अविनाश मारवाडी (वय ३०), पायल येसू मारवाडी (वय २६, रा. नेरेगाव रस्ता, कालव्याजवळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.