अलर्ट! दिल्ली बॉम्बस्फोटानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 07:52 PM2021-01-29T19:52:17+5:302021-01-29T19:53:36+5:30
Delhi Bomb Blast : दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा
मुंबई - दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी चर्चा करुन राज्यातील सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 29, 2021
राज्यातील जनतेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच सावधगिरी म्हणून दिल्ली विमानतळ, सरकारी इमारती आणि महत्वाच्या ठिकाणी अलर्ट जरी करून सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती सीआयएसएफने दिली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील करी रोड येथील फ्युचरेक्स मॅरॅथॉन इमारतीत कॉन्सुलेट जनरल ऑफ इस्राईलचे कार्यालय असून तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एन. एम जोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कार्यालय येते.
दिल्लीतील इस्रायलच्या दुतावासाजवळ स्फोट; पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी
राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 29, 2021
An alert has been issued at all airports, important installations and government buildings in view of blast reported in Delhi. Enhanced security measures have been put in place: Central Industrial Security Force pic.twitter.com/hWkTsTdJaX
— ANI (@ANI) January 29, 2021